Tuesday, 3 December 2024

Program: Sanskrit (SEC)-1 संभावित प्रश्न


B. A. III, SEMESTER - V
Program: Sanskrit 
Course category: Skil Enhancement Course (SEC)-1
Course Credits: 02


 संभावित प्रश्न 

1. शिवामहिम्न स्त्रोत्राची रचना कोणी केली – पुष्पदन्त

2. शिवामहिम्न स्त्रोत्रात किती श्लोक आहेत ? – 43
3. शिवामहिम्न स्त्रोत्र कोणालाअर्पण आहे - भागवान शंकर
4. शिवामहिम्न स्तोत्रात कोणाची महीमा सांगितली आहे ? - भगवान शिव
5. रामरक्षा स्तोत्रची रचणा कोणी केली ? बुद्धकौशिक मुनी/ वाल्मीकि
6. रामरक्षा स्त्रोत्रात किती श्लोक आहेत ? – 38
7. रामरक्षा स्त्रोत्र कोणालाअर्पण आहे – सीता रामचंद्र
8. रामरक्षा स्तोत्रात कोणाची महीमा सांगितली आहे ? – सीता रामचंद्र
9. रामरक्षा स्तोत्रात अनुष्टुप छंद आहे.
10. रामनाम हे विष्णु सहस्त्रनामशी समतुल्य आहे.
11. गणपती स्त्रोत्राची रचना कोणी केली – नारद मुनी
12. गणपती स्त्रोत्रात किती श्लोक आहेत ? – 8
13. गणपती स्त्रोत्र कोणालाअर्पण आहे – भागवान गणेश
14. गणपती स्तोत्रात कोणाची महीमा सांगितली आहे ? – भगवान गणेश
15. गणपती स्तोत्रात गणपतीच्या किती नावांचा उल्लेख आहे ? – 12
16. खलील श्लोक कोणत्या स्तोत्रातील आहे?- गणपती स्तोत्र
       विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
        पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ll

17. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे.
18. या वैदिक स्तोत्रात 10 ऋचा आहेत.
19. अथर्वशीर्षात फलश्रुती सहित 14 ऋचा/ श्लोक आहेत आहे. ( १० आणि १४ दोन्हीं असेल तर १४ लिहा.)
20. अथर्वशीर्ष मध्ये गणपतीची उपासना केलेली आहे.
21. अथर्वशीर्षात गाणेशविद्या सांगितलेली आहे.
22. याला अथर्वशीर्ष उपनिषद ही म्हणतात.
23. पुरुष सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्र संग्रह        आहे.
24. (ऋग्वेद १०.९०). हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे. पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन            आहे. त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले आहे.
25. या सूक्तामध्ये मन, प्राण, इंद्रिये, आदी शारीरिक व नैसर्गिक बाबींचा उल्लेख आहे.
26.या सूक्तामध्ये  चातुर्वर्णाचाही उल्लेख आहे.
27. यात यज्ञाचे वर्णन केले आहे.
28. या सूक्ताची देवता पुरुष आहे आणि ऋषी नारायण हे आहेत.
29. पुरुषसूक्त हे ऋग्वेदातील एक प्रसिद्ध तत्त्वज्ञानविषयक सूक्त आहे.
30. षोडशोपचार पूजा करताना पुरुष सूक्तातील एक एक ऋचा एका एका उपचारासाठी वापरली          जाते

Thursday, 28 November 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या संस्कृत भाषेतील भाषांतराचे अनावरण केले.


 

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या संस्कृत भाषेतील भाषांतराचे अनावरण केले. हा ऐतिहासिक प्रसंग 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनानिमित्त झाला. भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर तयार करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम होता, कारण संस्कृत ही भारतातील प्राचीनतम भाषांपैकी एक असून ती भारतीय संस्कृती आणि वारशाचे प्रतीक मानली जाते.

    संविधानाच्या या संस्कृत आवृत्तीमुळे भारतीय संविधानाचा गाभा आणि तत्त्वे एका समृद्ध ऐतिहासिक भाषेत मांडली गेली आहेत, ज्यामुळे ती अधिक व्यापक स्तरावर उपलब्ध होईल आणि तिचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.










Friday, 1 December 2023

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।। श्रीमद्भगवद्गीता 2.22

 


वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। 

तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।। श्रीमद्भगवद्गीता 2.22

भावार्थ - ज्या प्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो, त्याच प्रमाणे जीवात्मा ही जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. 

Just as human beings shed their old and worn-out clothes and don new attire, the atma (also referred to as dehi or soul) sheds an old and worn-out body to don a new body. |Bhagavad Gita – 2.22. |



नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ Bhagavad Gita 2.23

 नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ Bhagavad Gita 2.23

      भावार्थ - या आत्म्याला शस्त्रे मारू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू' शकत नाही आणि वारा वाळवू  शकत नाही.

in the Bhagwad Gita, Lord Krishna expounds the nature of the atma and tells Arjuna – The atma cannot be shattered by weapons, it cannot be burnt by fires, it cannot be drenched by the waters and it cannot be rendered dry by the winds. |2.23|




Thursday, 30 November 2023

ॐ ई॒शा वा॒स्य॑मि॒द सर्वं॒ यत्किं च॒ जग॑त्यां॒ जग॑त् । तेन॑ त्य॒क्तेन॑ भुञ्जीथा॒ मा गृ॑धः॒ कस्य॑ स्वि॒द्धन॑म् ।। १ ।।

ॐ ई॒शा वा॒स्य॑मि॒द सर्वं॒ यत्किं च॒ जग॑त्यां॒ जग॑त्  ।


तेन॑ त्य॒क्तेन॑ भुञ्जीथा॒ मा गृ॑धः॒ कस्य॑ स्वि॒द्धन॑म् ।। १ ।।

In the Lord is to be veiled all this—whatsoever moves on earth. Through such renunciation do thou save (thyself); be not greedy, for whose is wealth?



Monday, 19 June 2023

रघुवंशम् सर्ग -१ मराठी व्याख्या (श्लोक १-२५)

 

रघुवंशम् सर्ग -१ मराठी व्याख्या  (श्लोक  १-२५)




वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।

जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥१॥

                        पदच्छेद  वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।

जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥१॥

अन्वयार्थ- वागर्थप्रतिपत्तये - शब्द व त्याचा अर्थ ह्यांचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी (अहम्) (मी), वागर्थाविव - शब्द व त्यांचा अर्थ ह्यांच्याप्रमाणे, सम्पृक्तौ - नित्य संबंध असलेले, जगतः - जगाचे, पितरौ - आईवडील पार्वतीपरमेश्वरौ - पार्वती व भगवान शंकर यांना वन्दे वंदन करतो. ॥१॥

गद्यार्थ- शब्द व त्याचा अर्थ ह्यांचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी (मी) शब्द व त्यांचा अर्थ ह्यांच्याप्रमाणे नित्य संबंध असलेले जगाचे आईवडील पार्वती व भगवान शंकर यांना वंदन करतो.॥१॥

टीप- पार्वतीपरमेश्वरी ह्याचा शंकरपार्वती असा सरळ अर्थ न करता काहीजण त्यांचा पार्वतीय (पार्वतीपती) व रमेश्वर (रमा म्हणजे लक्ष्मी हिचा ईश्वर म्हणजे विष्णु) असा अर्थ करतात. ॥१॥







 

क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषया मतिः ।

तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् ॥२॥

                      पदच्छेद  क्व: सूर्यप्रभव: वंशः क्व च अल्पविषया मतिः ।

तितीर्षु: दुस्तरं मोहात् उडुपेन अस्मि सागरम् ॥२॥

अन्वयार्थ- क्व: - कोठे, सूर्यप्रभवः - सूर्यापासून उत्पन्न झालेला, वंश - वंश, कुळ, च- आणि, अल्पविषया - लहानसान विषयात चालणारी, (मम) (माझी), मतिः - बुद्धी, मोहात् - अज्ञानामुळे, (अहम्) (मी), उडुपेन- लहानशा नावेने, दुस्तरम्- तरून जाण्यास कठीण अशा, सागरम्- समुद्राला, तीतीर्षुः - तरून जाण्याची इच्छा करणारा, अस्मि- आहे. ॥२॥

 गद्यार्थ - फोठे सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि फोठे लहानसान विषयात चालणारी (माझी), बुद्धी. अज्ञानामुळे (मी) लहानशा नावेने तरून जाण्यास कठीण अशा समुद्राला तरून जाण्याची इच्छा करणारा आहे. |||| 



 

मन्दः कवियशः प्रार्थी गमिष्याम्युपहास्यताम् |

प्रांशुलभ्ये फले लोभादुद्वाहुरिव वामनः ॥३॥

                    पदच्छेद - मन्दः कवियशः प्रार्थी गमिष्यामि उपहास्यताम्

  प्रांशुलभ्ये फले लोभात् उद्वाहु: इव वामनः ॥३॥

अन्वयार्थ -  मन्दः - मूर्ख, कवियशः प्रार्थी - कवींच्या यशाची इच्छा करणारा, प्रांशुलभ्ये - उंच मनुष्याच्या हाताला येणाच्याफले -फलाकरिता, उद्वाहुः - हात वर करणाच्या, वामनः - इव ठेंगू माणसाप्रमाणे, उपहास्यताम् उपहासाला, गमिष्यामि - पात्र होईन. ॥३॥

गद्यार्थ – (शिवाय मी) मूर्ख कवींच्या यशाची इच्छा करणारा उंच मनुष्याच्या हाताला येणाऱ्या फलाकरिता हात वर करणाऱ्या, ठेंगण्या माणसाप्रमाणे उपहासाला पत्र होईल. ॥३॥

 

अथवा कृतवाग्द्वारे वंशेऽस्मिन्पूर्वसूरिभिः ।
         मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गतिः ॥ ४॥ 

               पदच्छेद - अथवा कृतवाग्द्वारे वंशे अस्मिन् पूर्वसूरिभिः ।

                             मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्य इव अस्ति मे गतिः ॥ ४॥

 अन्वयार्थ - अथवा – किंवा, तथापिपूर्वसूरिभिः -- कवींनी आपल्याकृतवाग्द्वारे – वाणीरूप दरवाजा बनवलेल्या,  अस्मिन् – ह्या,  वंशे (रघु) वंशातवज्रसमुत्कीर्णे – वज्राने सिद्ध केलेल्या,  मणौ – मण्यामध्ये, सूत्रस्य इव – धाग्याप्रमाणेमे – माझी, गतिः – संचारअस्ति – आहे. ॥ ४॥

 अर्थ -  तथापि प्राचीन कवींनी आपल्या वाक विभवाने यात प्रवेश करून ठेवलेल्या असल्यामुळे वेजे पाडलेल्या मण्यात सूत्राला ज्याप्रमाणे सहज प्रवेश करता येतो त्याप्रमाणे मलाही येथे मार्ग काढता येईल. ॥ ४॥





 

सोऽहमाजन्मशुद्धानामाफलोदयकर्मणाम् ।
        आसमुद्रक्षितीशानामानाकरथवर्त्मनाम् ॥ ५॥ 

                 पदच्छेद = स: अहम् आजन्मशुद्धानाम् आफलोदयकर्मणाम् ।

                              आसमुद्रक्षितीशानाम् आनाकरथवर्त्मनाम् ॥ ५॥

अन्वयार्थ - स: अहम् -- तो मी (कालिदास),  आजन्मशुद्धानाम् -- जन्मापासून शुद्ध असलेल्या,  आफलोदयकर्मणा -- फळप्राप्तीपर्यंत उद्योग करीत राहणाऱ्याआसमुद्रक्षितीशानाम् --  समुद्रापर्यंत पृथ्वीवर शासन करणाऱ्याआनाकरथवर्त्मनाम् -- स्वर्गापर्यंत रथाचा मार्ग असलेल्या, (रघूणाम् – रघुच्याअन्वयं – वंशाचेवक्ष्ये -- मी वर्णन करतो) ॥ ५॥

अर्थ - तो मी कालिदास जन्मापासून शुद्ध असलेल्या फळप्राप्तीपर्यंत उद्योग करीत राहणाऱ्या समुद्रापर्यंत पृथ्वीवर शासन करणाऱ्या स्वर्गापर्यंत रथाचा मार्ग असलेल्या (रघुच्या वंशाचे मी वर्णन करतो). ॥ ५॥

  

यथाविधिहुताग्नीनां यथाकामार्चितार्थिनाम् ।

यथापराधदण्डानां यथाकालप्रबोधिनाम् ॥ ६॥

               पदच्छेद - यथा-विधि-हुताग्नीनां यथा-कामार्चितार्थिनाम् ।

                           यथा-पराध-दण्डानां यथाकाल-प्रबोधिनाम् ॥ ६॥

 अन्वयार्थ = यथाविधि-हुत-अग्नीनाम् -- विधिपूर्वक अग्नीत आहुती देणाऱ्या,   यथाकाम-अर्चित-अर्थिनाम् -- याचकांच्या इच्छेनुसार दान देणाऱ्यायथा-अपराध-दण्डानाम् -- अपराधनुसार शासन करणाऱ्यायथाकाल-प्रबोधिनाम् -- योग्य काळी जागे होणाऱ्या, (रघूणाम् – रघुच्याअन्वयं  वंशाचे, वक्ष्ये -- मी वर्णन करतो).॥ ६॥

 अर्थ - विधिपूर्वक अग्नीत आहुती देणाऱ्या याचकांच्या इच्छेनुसार दान देणाऱ्या अपराधनुसार शासन करणाऱ्या योग्य काळी जागे होणाऱ्या (रघुच्या वंशाचे मी वर्णन करतो). ॥ ६॥

  

त्यागाय संभृतार्थानां सत्याय मितभाषिणाम् ।

यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनाम् ॥ ७॥

              पदच्छेद - त्यागाय संभृतार्थानां सत्याय मितभाषिणाम् ।

                           यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनाम् ॥ ७॥

          अन्वयार्थ -  त्यागाय -- दान देण्यासाठी, संभृतार्थानां -- धनसंचय करणाऱ्या, सत्याय -- सत्याचे (रक्षण करण्यासाठी)मितभाषिणाम् -- अल्पभाषण करणाऱ्या,  यशसे -- कीर्ती करिता विजिगीषूणां -- विजयाची इच्छा करणाऱ्या, प्रजायै -- संतती प्राप्तीसाठी, गृहमेधिनाम् -- गृहस्थाश्रम स्वीकारणाऱ्या, (रघूणाम् – रघुच्या, अन्वयं – वंशाचे, वक्ष्ये -- मी वर्णन करतो)  ॥ ७॥

 अर्थ - दान देण्यासाठी धनसंचय करणाऱ्या, सत्याचे (रक्षण करण्या-)साठी, अल्पभाषण करणाऱ्या, कीर्ती करिता विजयाची इच्छा करणाऱ्या, संतती प्राप्तीसाठी गृहस्थाश्रम स्वीकारणाऱ्या, (रघुच्या वंशाचे मी वर्णन करतो). ॥ ७॥

 

शैशवेऽभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम् ।

वार्द्धके मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम् ॥ ८॥

               पदच्छेद  शैशवे अभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम् ।

                          वार्द्धके मुनिवृत्तीनां योगेन अन्ते तनुत्यजाम् ॥ ८॥

 अन्वयार्थ - शैशवे अभ्यस्तविद्यानाम् -- बालपणी विद्याभ्यास करणाऱ्या,   यौवने विषयैषिणाम् -- तारुण्यात विषय उपभोगाची इच्छा बाळगणाऱ्या, वार्द्धके मुनिवृत्तीनां -- म्हातारपणी मुलींची वृत्ती धारण करणाऱ्या, अन्ते योगेन तनुत्यजाम् -- अंतकाली योगाच्या द्वारे (परमात्म्याचे ध्यान करीत) देहत्याग करणाऱ्या, (रघूणाम् – रघुच्या, अन्वयं – वंशाचे, वक्ष्ये -- मी वर्णन करतो)   ॥ ८॥

 अर्थ -बालपणी विद्याभ्यास करणाऱ्या, तारुण्यात विषय उपभोगाची इच्छा बाळगणाऱ्या, म्हातारपणी मुलींची वृत्ती धारण करणाऱ्या, व अंतकाली योगाच्या द्वारे (परमात्म्याचे ध्यान करीत) देहत्याग करणाऱ्या, (रघुच्या वंशाचे मी वर्णन करतो).

  

रघूणामन्वयं वक्ष्ये तनुवाग्विभवोऽपि सन् ।
तद्गुणैः कर्णमागत्य चापलाय प्रचोदितः ॥ ९॥

             पदच्छेद – रघूणाम् अन्वयम् वक्ष्ये तनुवाग्विभवः अपि सन् ।

तद्गुणैः कर्णम् आगत्य चापलाय प्रचोदितः ॥ ९॥

 अन्वयार्थ - तनुवाग्विभवः सन् अपि- वाणीचे वैभव कमी असूनहीतद्गुणैः - त्यांच्या( रघुवंशीय राजांच्या)  गुणांच्या द्वारेकर्णमागत्य - कानावर येऊन चापलाय - (काव्य लिहिण्याचे) धाडस करण्यास, प्रचोदितः - प्रवृत्त झालेला, (अहं - मीकवि: कालिदास: - कवी कालिदास) , (रघूणाम् – रघुच्या, अन्वयं – वंशाचे, वक्ष्ये -- मी वर्णन करतो)

 गद्यार्थ -- वाणीचे वैभव कमी असूनही त्यांच्या रघुवंशीय राजांच्या गुणांच्या द्वारे कानावर येऊन काव्य लिहिण्याचे धाडस करण्यास प्रवृत्त झालेला, (मी कवी कालिदास), रघुच्या वंशाचे वर्णन करतो.

 

तं सन्तः श्रोतुमर्हन्ति सदसद्  व्यक्तिहेतव:।

हेम्नः संलक्ष्यते ह्यग्नौ विशुद्धिः श्यामिकाऽपि वा ॥१०॥

           पदच्छेद – तं सन्तः श्रोतुम् अर्हन्ति सद् असद्  व्यक्तिहेतव:।

हेम्नः संलक्ष्यते हि अग्नौ विशुद्धिः श्यामिका अपि वा ॥१०॥

        अन्वयार्थ --  सदसद्व्यक्तिहेतव: -- गुणदोषांची चांगल्या प्रकारे पारख करणारे,   सन्तः --सज्जन, विद्वान लोक, तम् - त्या (रघुवंशमहाकाव्याला) श्रोतुम् अर्हन्ति - ऐकण्यास पात्र आहेतहि - कारणहेम्नः - सोन्याची,  विशुद्धिः - शुद्धता वा - किंवा श्यामिका अपि -  काळसरपणा,हिनकसपना देखीलअग्नौ - अग्नीत, संलक्ष्यते- दिसून येतो.

 गद्यार्थ --गुणदोषांची चांगल्या प्रकारे पारख करणारे सज्जन, विद्वान लोक त्या रघुवंशमहाकाव्याला ऐकण्यास पात्र आहेत कारण सोन्याची शुद्धता किंवा काळसरपणा, हिनकसपना देखील अग्नीत  दिसून येतो.

 

वैवस्वतो मनुर्नाम माननीयो मनीषिणाम् ।

आसीन्महीक्षितामाद्यः प्रणवश्छन्दसामिव ॥ ११॥

                       पदच्छेद – वैवस्वतो मनुर् नाम  माननीयो मनीषिणाम् ।

आसीत् महीक्षिताम् आद्यः प्रणवः छन्दसाम्  इव ॥ ११॥

    अन्वयार्थ -- मनीषिणाम् - विद्वानांमध्ये,  माननीय: - पूज्य,   वैवस्वतो नाम वैवस्वत नावाचामनु: -  मनू , छन्दसाम् - वेदांतीलप्रणवः इव - ॐकाराप्रमाणेमहीक्षिताम् - राजांमध्येआद्यः - पहिला (राजा),  आसीत् - होऊन गेला.

गद्यार्थ - विद्वानांमध्ये  पूज्य वैवस्वत नावाचा मनू वेदांतील ॐकाराप्रमाणे राजांमध्ये पहिला (राजा) होऊन गेला.   

 

तदन्वये शुद्धिमति प्रसूतः शुद्धिमत्तरः ।

दिलीप इति राजेन्दुरिन्दुः क्षीरनिधाविव ॥१२॥

                            पदच्छेद – तद्  अन्वये शुद्धिमति प्रसूतः शुद्धिमत्तरः ।

दिलीप: इति राजेन्दु: इन्दुः क्षीरनिधौ इव ॥१२॥

    अन्वयार्थ - शुद्धिमति - पवित्र अशा, तत् -  त्याच्याअन्वये - कुळामध्येशुद्धिमत्तरः - अतिशय पवित्रदिलीप इति - दिलीप नावाचाराजेन्दु: इन्दुः - रामचंद्र (राजांमध्ये श्रेष्ठ)इन्दुः इव  - चंद्राप्रमाणेप्रसूतः - उत्पन्न झाला. ॥ १२ ॥   

    गद्यार्थ - पवित्र अशा त्याच्या कुळामध्ये अतिशय पवित्र दिलीप नावाचा रामचंद्र (राजांमध्ये श्रेष्ठ) क्षीरसमुद्रातून चंद्राप्रमाणे उत्पन्न झाला. ॥ १२ ॥

 

व्यूढोरस्को वृषस्कन्धः शालप्रांशुर्महाभुजः ।

आत्मकर्मक्षमं देहं क्षात्रो धर्म इवाश्रितः ॥१३॥

                            पदच्छेद – व्यूढोरस्क: वृषस्कन्धः शालप्रांशु: महाभुजः ।

आत्मकर्मक्षमं देहं क्षात्र: धर्म इव आश्रितः ॥१३॥

    अन्वयार्थ - व्यूढोरस्क: - रुंद  छातीचावृषस्कन्धः - बैलासारखे (मांसल व पुष्ट) खांदे असलेलाशालप्रांशु: - शालवृक्षाप्रमाणे उंच,  महाभुजः - विशाल बाहू असलेलाआत्मकर्मक्षमं - आपल्या कर्माला अनुकूलदेहम् - शरीरआश्रितः, -  धारण केलेलाक्षात्र: धर्म - (मूर्तिमंत) क्षात्रधर्मच .॥ १३ ॥     

    गद्यार्थ - रुंद  छातीचा , बैलासारखे (मांसल व पुष्ट) खांदे असलेला , शालवृक्षाप्रमाणे उंच (व) विशाल बाहू असलेला (असा तो) आपल्या कर्माला अनुकूल शरीर धारण केलेला जणू काय (मूर्तिमंत) क्षात्रधर्मच .॥ १३ ॥

 

सर्वातिरिक्तसारेण सर्वतेजोऽभिभाविना ।

स्थितः सर्वोन्नतेनोर्वीं क्रान्त्वा मेरुरिवात्मना ॥१४॥

                   पदच्छेद –  सर्वातिरिक्तसारेण सर्वतेज: अभिभाविना ।

स्थितः सर्वोन्नतेन उर्वीं क्रान्त्वा मेरु: इव आत्मना ॥१४॥

    अन्वयार्थ  – (राजा दिलीप) सर्वातिरिक्तसारेण - सर्वांहून अधिक अशा बलाने, सर्वतेज: अभिभाविना - सर्वांना दिपवून टाकणाऱ्या तेजाने, सर्वोन्नतेन आत्मना - सर्वांहून उचा अशा शरीराने, मेरु: इव - सुमेरू पर्वताप्रमाणे, उर्वीम् – पृथ्वीला, क्रान्त्वा - आक्रमून, स्थितः - राहिला होता.॥१४॥

    गद्यार्थ – (राजा दिलीप) सर्वांहून अधिक अशा बलाने, सर्वांना दिपवून टाकणाऱ्या तेजाने, सर्वांहून उचा अशा शरीराने सुमेरू पर्वताप्रमाणे पृथ्वीला आक्रमून, स्थित राहिला होता.॥१४॥

 

 

 

आकारसदृशप्रज्ञः प्रज्ञया सदृशागमः ।

आगमैः सदृशारम्भ आरम्भसदृशोदयः ॥१५॥

                        पदच्छेद –  आकारसदृशप्रज्ञः प्रज्ञया सदृशागमः ।

आगमैः सदृशारम्भ आरम्भसदृशोदयः ॥१५॥

अन्वयार्थ  – (स: भूपति: दिलीप)-( तो राजा दिलीप) आकारसदृशप्रज्ञः - शरीराला साजेशी बुद्धी असलेला, प्रज्ञया सदृशागमः - बुद्धीला अनुरूप विद्याभ्यास असलेला, आगमैः सदृशारम्भ - विद्याभ्यासानुरूप कार्य करणारा, आरम्भसदृशोदयः - आरंभिलेल्या कार्यानुरूप फलनिष्पत्ती असलेला, आसीत् (असा होता). ॥१५॥        

गद्यार्थ – ( तो राजा दिलीप)  शरीराला साजेशी बुद्धी असलेला, बुद्धीला अनुरूप विद्याभ्यास असलेला, विद्याभ्यासानुरूप कार्य करणारा (आणि) आरंभिलेल्या कार्यानुरूप फलनिष्पत्ती असलेला (असा होता). ॥१५॥

 

भीमकान्तैर्नृपगुणैः स बभूवोपजीविनाम् ।

अधृष्यश्चाभिगम्यश्च यादोरत्नैरिवार्णवः ॥१६॥

                         पदच्छेद – भीमकान्तै: नृपगुणैः स:  बभूव उपजीविनाम् ।

अधृष्य: च अभिगम्य: च यादोरत्नै: इव अर्णवः ॥१६॥

अन्वयार्थ  – भीमकान्तै: - (न्यायिक कठोरता, तेज, प्रताप, व दक्षिण्यादिंनी) भयंकर आणि (कोमलता, दयाळूपणा इत्यादिंनी) मनोहर, नृपगुणैः - राजोचित गुणांनी, स: - तो (राजा दिलीप ), उपजीविनाम् - आश्रित (नोकर-चाकर इत्यादी) लोकांना, यादोरत्नै: - (मकरादी) जलचर प्राणी व रत्ने त्यांच्या योगाने, अर्णवः इव – समुद्राप्रमाणे, अधृष्य: - भितीप्रद, अभिगम्य: च - व आश्रय करण्यास योग्य, आदरणीय, आदरणीय - झाला.॥ १६ ॥           

गद्यार्थ –  (न्यायिक कठोरता, तेज, प्रताप, व दक्षिण्यादिंनी) भयंकर आणि (कोमलता, दयाळूपणा इत्यादिंनी) मनोहर अशा राजोचित गुणांनी  तो (राजा दिलीप ) आश्रित (नोकर-चाकर इत्यादी) लोकांना आणि (मकरादी) जलचर प्राणी व रत्ने त्यांच्या योगाने समुद्राप्रमाणे भितीप्रद व आश्रय करण्यास योग्य, आदरणीय झाला.॥ १६ ॥

 

रेखामात्रमपि क्षुण्णादामनोर्वर्त्मनः परम् ।

न व्यतीयुः प्रजास्तस्य नियन्तुर्नेमिवृत्तयः ॥१७॥

                     पदच्छेद – रेखामात्रम् अपि क्षुण्णात् आमनो:  वर्त्मनः परम् ।

न व्यतीयुः प्रजा:  तस्य नियन्तु:  नेमिवृत्तयः ॥१७॥

 अन्वयार्थ  – नियन्तु: - नियमन वा शासन करणाऱ्या, तस्य – त्याच्या, नेमिवृत्तयः - चाकाच्या  धावेप्रमाणे ज्यांचे व्यवहार असणाऱ्या, प्रजा: -प्रजा, आमनो: - मनूच्या काळापासून, क्षुण्णात् - चालत आलेल्या, वर्त्मनः – मार्गापासून, रेखामात्रम् अपि - थोडीशीही , काडीभरसुद्धा, न व्यतीयुः - च्युत झाली नाही, ढळली नाही.॥१७॥ 

        गद्यार्थ  नियमन वा शासन करणाऱ्या त्याच्या चाकाच्या  धावेप्रमाणे ज्यांचे व्यवहार असणाऱ्या प्रजा मनूच्या काळापासून चालत आलेल्या मार्गापासून थोडीशीही , काडीभरसुद्धा च्युत झाली नाही.॥१७॥

          टीप – येथे नियन्तु: ह्याचा अर्थ दिलीपपक्षी जसा करणारा असा घ्यायचा तसाच, सारथी असाही घेतला पाहिजे. व नेमिवृत्तय: हे रूढ मार्गाने चालणारी अशा अर्थी प्रजेचे विशेषण घ्यावयाचे, त्याचप्रमाणे नेमिवृत्तय: याचा अर्थ चाकाच्या फेर्या असाही घेतला पाहिजे; म्हणजे सर्व श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो.-

          गद्यार्थ – कुशल सारथ्याच्या रथाची चाके ज्याप्रमाणे चाकोरी सोडून बाहेर जात नाहीत त्याप्रमाणे रूढ मार्गाने चालणारे त्याचे प्रजाजन मनूपासून काडीमात्र ढळले नाहीत. ॥१७॥

 

प्रजानामेव भूत्यर्थं स ताभ्यो बलिमग्रहीत् ।

सहस्रगुणमुत्स्रष्टुमादत्ते हि रसं रविः ॥१८॥

                        पदच्छेद – प्रजानाम् एव भूत्यर्थं स ताभ्यो बलिम् अग्रहीत् ।

सहस्रगुणम् उत्स्रष्टुम् आदत्ते हि रसं रविः ॥१८॥

     अन्वयार्थ  – (यथा) हि – (ज्याप्रकारे), रवि: - सूर्य, सहस्रगुणम् – हजारो पटींनी, (पर्जन्यरूपाने अधिक), उत्स्राष्टुम् – वर्षाव करण्यासाठी, देण्यासाठी, (पृथ्वीकडून), रसम् – जल, आदत्ते – घेतो, (तथैव) - (त्याप्रकारे), स: - तो (भूपति: दिलीप: - राजा दिलीप), प्रजानाम् – प्रजेच्या, भूत्यर्थं – समृद्धीसाठीच, ताभ्य: - त्यांच्यापसून, बलिम् – करभार, अग्रहीत् - घेत असे.।। १८ ॥

    गद्यार्थ  ज्याप्रकारे सूर्य, सहस्रगुणम् – हजारो पटींनी, (पर्जन्यरुपाने अधिक) वर्षाव करण्यासाठी, देण्यासाठी (पृथ्वीकडून) जल घेतो (त्याप्रकारे) तो (राजा दिलीप) प्रजेच्या समृद्धीसाठीच त्यांच्यापसून करभार घेत असे.।। १८ ॥

 

सेना परिच्छदस्तस्य द्वयमेवार्थसाधनम् ।

शास्त्रेष्वकुण्ठिता बुद्धिर्मौर्वी धनुषि चातता ॥१९॥

                     पदच्छेद –  सेना परिच्छद: तस्य द्वयम् एव अर्थसाधनम् ।

                                      शास्त्रेषु अकुण्ठिता बुद्धि: मौर्वी धनुषि च आतता ॥१९॥

    अन्वयार्थ  – तस्य (राज्ञो दिलीपस्य) - त्या (दिलीप राजाची), सेना  - (चतुरंगिणी) सेना, परिच्छद: - लवाजमा (होती), अर्थसाधनम् - प्रयोगाच्या सिद्धीसाठी साधन (म्हणून), द्वयम् एव - केवळ दोनच (गोष्टी होत्या),  शास्त्रेषु अकुण्ठिता बुद्धि: - शास्त्रांमध्ये अव्याहत (प्रवेश करणारी) बुद्धी, च – आणि,  (२) धनुषि – धनुष्यावर, आतता – चढवलेली, मौर्वी - प्रत्यंचा.॥१९॥

    गद्यार्थ  त्या (दिलीप राजाची) (चतुरंगिणी) सेना (एक मोठा) लवाजमा (होती), (तसेच) प्रयोगाच्या सिद्धीसाठी साधन म्हणून केवळ दोनच (गोष्टी होत्या) – (१) शास्त्रांमध्ये अव्याहत (प्रवेश करणारी) बुद्धी आणि  (२) धनुष्यावर चढवलेली प्रत्यंचा.॥१९॥

 

तस्य संवृतमन्त्रस्य गूढाकारेङ्गितस्य च ।

फलानुमेयाः प्रारम्भाः संस्काराः प्राक्तना इव ॥२०॥

                   पदच्छेद – तस्य संवृतमन्त्रस्य गूढाकारेङ्गितस्य च ।

फलानुमेयाः प्रारम्भाः संस्काराः प्राक्तना इव ॥२०॥

 

    अन्वयार्थ  – संवृतमन्त्रस्य - सल्लामसलती, खलबते गुप्त ठेवणाऱ्या, गूढाकारेङ्गितस्य - भाव व संकेत गुप्त असलेल्या, तस्य (राज्ञो दिलीपस्य) - त्याचे (दिलीप राजाचे), प्रारम्भाः - राजकीय धोरण (=समदामादी उपायविषयक कार्य) प्राक्तना: - पूर्वजन्मीच्या संस्काराप्रमाणे, फलानुमेयाः - परिणामावरून अनुमानावे लागे.॥२०॥

    गद्यार्थ  सल्लामसलती, खलबते गुप्त ठेवणाऱ्या, भाव व संकेत गुप्त असलेल्या त्या (दिलीप राजाचे) राजकीय धोरण (=समदामादी उपायविषयक कार्य) पूर्वजन्मीच्या संस्काराप्रमाणे परिणामावरून अनुमानावे लागे.॥२०॥

 

जुगोपात्मानमत्रस्तः भेजे धर्ममनातुरः ।

अगृध्नुराददे सोऽर्थमसक्तः सुखमन्वभूत् ॥२१॥

                  पदच्छेद – जुगोप आत्मानम् अत्रस्तः भेजे धर्मम् अनातुरः ।

                                 अगृध्नु: आददे स: अर्थम् असक्तः सुखम् अन्वभूत् ॥२१॥

अन्वयार्थ  – स: (दिलीप:) - तो (दिलीप), अत्रस्तः - निर्भय होऊन, आत्मानम् – स्वतःचे,  जुगोप - रक्षण करीत असे, निरोगी अवस्थेत, धर्मं भेजे - धर्माचरण करीत असे, अगृध्नु: - निर्लोभीपणे, अर्थम् – संपत्ती, आददे - मिळवीत असे, असक्तः - आसक्ती रहित होऊन, सुखम् अन्वभूत् - सुखोपभोग भोगीत असे.॥ २१॥

  गद्यार्थ  तो (दिलीप) निर्भय होऊन स्वतःचे रक्षण करीत असे, निरोगी अवस्थेत धर्माचरण करीत असे, निर्लोभीपणे संपत्ती मिळवीत असे, आसक्ती रहित होऊन सुखोपभोग भोगीत असे.॥ २१॥

टीप- ‘जुगोपात्मानमत्रस्तः’ असे म्हणण्यात आत्मारक्षाणाच्या बाबतीत तो स्वतः समर्थ होता. त्याला दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहावे लागत नसे. असा अर्थ ध्वनित आहे. व ‘धर्ममनातुरः’ असे म्हणण्यात असे ध्वनित केले आहे की, सर्वसाधारण लोकांप्रमाणे केवळ दुखणे झाले असता अगर संकटकाळापुरतीच त्याला धर्माची आठवण होत असे नव्हे, तर नसतानाही तो धर्माला विसरत नसे. ॥ २१॥

 

ज्ञाने मौनं क्षमा शक्तौ त्यागे श्लाघाविपर्ययः ।

गुणा गुणानुबन्धित्वात्तस्य सप्रसवा इव ॥२२॥

                        पदच्छेद – ज्ञाने मौनं क्षमा शक्तौ त्यागे श्लाघाविपर्ययः ।

गुणा: गुणानुबन्धित्वात् तस्य सप्रसवा इव ॥२२॥

अन्वयार्थ  – (स: दिलीप:) - (तो दिलीप), ज्ञाने - ज्ञात असूनही, मौनं - मौन बाळगत असे, शक्तौ - सामर्थ्य असूनही, क्षमा - क्षमा करीत असे, त्यागे - दान देत असूनही, श्लाघाविपर्ययः - आत्मप्रशंसेचा अभाव असे, (ह्या प्रमाणे) तस्य - त्याचे, (परस्पर विरोधी) गुणा: - गुण, गुणानुबन्धित्वात् - गुणांशी असणाऱ्या सहचार्यामुळे, सप्रसवा इव - जुळ्या भावंडाप्रमाणे (होते). ॥२२॥

गद्यार्थ  (तो दिलीप) ज्ञात असूनही मौन बाळगत असे, सामर्थ्य असूनही क्षमा करीत असे, दान देत असूनही (त्यांच्याठिकाणी) आत्मप्रशंसेचा अभाव असे, (ह्या प्रमाणे) त्याचे, (परस्पर विरोधी) गुण गुणांशी असणाऱ्या सहचार्यामुळे जुळ्या भावंडाप्रमाणे (होते). ॥२२॥

टीप – थोडेसे ज्ञान असले की त्याने फुशारून जाने, थोडी शक्ती असली की ज्याला त्याला धडाका मारणे, थोडेसे दातृत्व दाखीविले की त्याचा नगारा पिटणे, हे सर्वसाधारण मनुष्यस्वभाव असतात हे प्रसिद्धच आहे. ॥२२॥

 

अनाकृष्टस्य विषयैर्विद्यानां पारदृश्वनः ।

तस्य धर्मरतेरासीद्वृद्धत्वं जरसा विना ॥२३॥

                        पदच्छेद – अनाकृष्टस्य विषयै:  विद्यानां पारदृश्वनः ।

तस्य धर्मरते: आसीत् वृद्धत्वं जरसा विना ॥२३॥

अन्वयार्थ  – विषयै:  - विषयांनी, अनाकृष्टस्य - ताब्यात न गेलेल्या, विद्यानां - (विविध) विद्यांच्यात, पारदृश्वनः - पारंगत असलेल्या, धर्मरते: - धर्माचरणात तत्पर असलेल्या, तस्य - त्या राजाला, जरसा विना – म्हातारपणाशिवाय, वृद्धत्वम् आसीत् - वृद्धत्व आले होते. ॥२३॥

गद्यार्थ  विषयांनी ताब्यात न गेलेल्या (विविध) विद्यांच्यात पारंगत असलेल्या, धर्माचरणात तत्पर असलेल्या, त्या राजाला म्हातारपणाशिवाय वृद्धत्व आले होते. ॥२३॥

टीप – यदाह मनु: - न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिर:‍‌‍‌‍‌‍ ।

                         यो वै युवाऽप्यधीयानस्तं देवा: स्थविरं विदु: ॥  

 

प्रजानां विनयाधानाद्रक्षणाद्भरणादपि ।

स पिता पितरस्तासां केवलं जन्महेतवः ॥२४॥

                पदच्छेद – प्रजानां विनयाधानात् रक्षणात् भरणात्  अपि ।

स: पिता पितर: तासां केवलं जन्महेतवः ॥२४॥

अन्वयार्थ  – स: - तो (राजा), प्रजानाम् – प्रजालोकांची, विनयाधानात् - शिक्षणाची व्यवस्था करीत असल्यामुळे, रक्षणात् - रक्षण करीत असल्यामुळे, भरणात् - भरणपोषण करीत असल्यामुळे, (प्रजेचा), पिता - पिता होता, तासां – त्यांचे, पितर: - मातापिता, केवलम् – फक्त, जन्महेतवः - जन्मदाते होते.॥ २४ ॥

गद्यार्थ  तो (राजा) प्रजालोकांची शिक्षणाची व्यवस्था करीत असल्यामुळे, रक्षण करीत असल्यामुळे, भरणपोषण करीत असल्यामुळे (प्रजेचा) पिता होता, त्यांचे माता-पिता फक्त जन्मदाते होते.॥ २४ ॥

 

स्थित्यै दण्डयतो दण्ड्यान्परिणेतुः प्रसूतये ।

अप्यर्थकामौ तस्यास्तां धर्म एव मनीषिणः ॥२५॥

                      पदच्छेद – स्थित्यै दण्डयतो दण्ड्यान् परिणेतुः प्रसूतये ।

अपि अर्थकामौ तस्य आस्तां धर्म एव मनीषिणः ॥२५॥ 

अन्वयार्थ  – स्थित्यै – समाजधारणेकरिता, दण्ड्यान् – अपराध्यांना, दण्डयत: - शिक्षा करणाऱ्या, प्रसूतये –संतानप्राप्तीसाठी, परिणेतुः - विवाह करणाऱ्या, तस्य – त्या, मनीषिणः - विद्वान राजाचे, धर्म: एव - (अर्थ व काम देखील) धर्मच, आस्ताम् - होते. ॥२५॥

गद्यार्थ  समाजधारणेकरिता अपराध्यांना शिक्षा करणाऱ्या, (आणि) संतानप्राप्तीसाठी विवाह करणाऱ्या, त्या विद्वान राजाचे (अर्थ व काम देखील) धर्मच होते. ॥२५॥

टीप – कोणत्याही प्रकारे आसक्त न होता आपापल्या गुणकर्मानुसार कर्तव्य केल्यास ते मनुष्यास बंधनकारक होत नाही. तो त्याचा धर्मच आहे. अशी गीतेचीही शिकवण आहे.॥२५॥

Program: Sanskrit (SEC)-1 संभावित प्रश्न

B. A. III, SEMESTER - V Program: Sanskrit  Course category: Skil Enhancement Course (SEC)-1 Course Credits: 02 अथर्वशीर्ष  ,  पुरुषसूक्त ,  ...